
• पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर कार्यक्रम..
• कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
परभणी, दि.21 /02/2025. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या उपस्थितीत महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरीपत्र व किमान 10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी दुपारी 4.35 वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित केला आहे. यादिवशी या कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा , तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे होणार आहे.
परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्षा नतीशा माथूर यांनी केले आहे.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post