




रवींद्र पवार..
तालुका प्रतिनिधी शिरूर..
शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,रांजणगाव ,कारेगाव ,व शिरूर मध्ये गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव अतिशय आनंदात व थाटामाटात साजरा करण्यात आला.यावेळी सणसवाडी आनंदनगर येथे दादाराव जाधव साहेब यांच्या हस्ते क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांना भोग भंडारा लावून सनस वाडी ते क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज मंदिर भाऊराया खंडाळे गणेगाव येथे पर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोर सेनेचे जिल्हा सचिव रवी दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅलीचे तसेच शिरूर तालुका अध्यक्ष अक्षय भाऊ पवार, सोनार भाईजान ,दत्ताभाऊ जाधव ,पंकज आडे ,प्रदीप आडे, रोहन राठोड ,गोपाल पवार , युवराज राठोड आकाश राठोड, रामा राठोड, श्रावण राठोड, उमेश जाधव, राहुल चव्हाण,अमोल चव्हाण,सचिन जाधव, अजय राठोड, अर्जुन राठोड, दिपक राठोड, प्रमोद चव्हाण, चेतन राठोड, योगेश राठोड,कारेगाव नगरीचे नायक व जयंती अध्यक्ष देविदास भाऊ पवार निखिल जाधव साहेब कारभारी कारेगाव मधील सर्व मित्रमंडळी सर्व मिळून आयोजन केले होते. तसेच मंदिरावर भोग भंडारा लावून कारेगाव मध्ये रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सकल गोर बंजारा समाज पुणे नगर हायवे चे गोर सेना संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post