
धाराशिव जिल्ह्यातील येडशी या वनविभागात गेल्या तीन महिन्यापासून वाघोबाची वावर दिसून येत आहे. तरीदेखील अद्याप वन विभागाला पकडण्यात यश आलं नाही सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी गेल्या सात दिवसा पूर्वी वन विभागाला निवेदन दिले होते त्या निवेदनात असे नमूद स्पष्ट केले होते की जर सात दिवसात वाघोबाला पकडण्यात यश आले नाही तर आम्ही आंदोलन करू तेथील वन विभाग अधिकारी जागेवर नाहीत गेल्या सात दिवसापूर्वी एक निवेदन दिले होते आणि आज त्या दिवसार्पर्यंत पण वन विभाग अधिकारी दिसून आले नाहीत.अधिकारी महिन्यातून एक ते दोन वेळेस येतात अधिकाऱ्याचे या गोष्टीकडे गंभीरपणे लक्ष देत नाहीत त्यामुळे जाधव यांनी कागदी वाघ रिकाम्या खुर्चीला भेट दिला. आणि अधिकाऱ्यांच्या तीव्र निषेध व्यक्त केला.या घटने मुळे स्थानिक नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून ,प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलली नाही ,तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे..
Discussion about this post