

सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
छत्रपती शिवरायांचे आयुष्य हा विश्वासाठी एक दीपस्तंभ आहे . पारदर्शक असा वारसा आहे . असे प्रतिपादन इतिहास संशोधक देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर येथील शिवव्याख्याते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु .येथे जगदंब प्रतिष्ठान व राहेरी गावकरी यांच्या संयुक्त आयोजित शिवजयंती निमित्त व्याख्यानात काढले .
डॉ. शिवानंद भानुसे पुढे म्हणाले छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले .त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व राजमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रेरणा त्यासाठी कारणीभूत होती या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यापासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. शिवरायांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारी व गुलामगिरी मोडून काढली. व समता स्थापित केली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन जागतिक इतिहासातील पहिले एकमेव मानवतावादी योद्धा, शासक, प्रशासक, शिक्षणतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, भाषा शास्त्रज्ञ, उत्कृष्ट स्थापत्य अभियंता होते. त्यामुळेच रयत त्यांना कुळवाडी भूषण, लोककल्याणकारी जाणता राजा मानत होती. त्यांचा आदर्श घेऊन आज आपण सर्वांनीच वाटचाल केली पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. भानुसे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप नाईकवाड होते तर विचार पिठावर किनगावराजा स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे, मोहिनी भानुसे, निसर्ग भानुसे, सृष्टी भानुसे, बालाजी देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
सूत्रसंचालन तुकाराम देशमुख, सुरज देशमुख यांनी केले तर कार्यक्रमासाठी जगदंब प्रतिष्ठानचे आनंद देशमुख, सुभाषराव देशमुख, डॉक्टर राजे, अनिल देशमुख, विठ्ठल देशमुख, धनंजय देशमुख, मदन देशमुख , सरपंच संता बालाजी देशमुख, उपसरपंच कोकिळा काकू गवई , रमेश देशमुख, वैभव देशमुख, अनिकेत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले..
Discussion about this post