
परभणी, दि. 24 (जिमाका) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेल्फ मोडव्दारे, कॅम्प मोडव्दारे व सीएससी मोडव्दारे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
केंद्र शासनाचा अॅग्रीस्टॅक हा एक महत्त्वकांक्षी असा डिजिटल उपक्रम असून यामध्ये शेतकऱ्यांना माहिती संच तयार केले जात असून प्रत्येक शेतकऱ्यांना एक विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार करण्याची कारवाई राज्यभर सुरु आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीची संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. शेतकरी माहिती संचमध्ये दि.31 जानेवारी पर्यत 25 टक्के शेतकऱ्यांची नोंद आणि दि. 28 फेब्रुवारी पर्यंत 100 टक्के शेतकऱ्यांनी नोंद होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत..
Discussion about this post