
प्रतिनिधी :- नागनाथ रावीकर
विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणे ,त्यांना उंच आकाशात उडण्याची प्रेरणा देणे, मीही काहीतरी करू शकतो ही भावना निर्माण करून त्यांना क्षितिजाच्या पलीकडे पोहोचवणे आणि म्हणणे घे भरारी घे भरारी……..
या संकल्पनेतून आज दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी जि. प. प्रा. शा. रावी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.आज शाळेचा कारभार विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आला. तनुजा शेषराव जोल्ले हिने मुख्याध्यापक व हुल्लप्पा राजू निलेवाडे याने उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. सीमा फुले,आरती सुरनर, आरती जोल्ले, आरती धुळगंडे, मीरा पांचाळ ,मोहिनी कोये, श्रीसागर सुरनर ,सुदर्शन करगळे यांनी मुलांना शिकवण्याचा आनंद घेतला .माधव देवकते याने सेवकाची भूमिका पार पाडली.
शि. वि.अधिकारी श्री दिलीपराव मारोतराव देवकते यांनी स्वयंशासन दिनानिमित्त शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. मुलांनी सकाळपासूनच शिकवण्याचा आनंद घेतला.शाळेतील सर्व शिक्षकांनी निरीक्षकाची भूमिका पार पाडली. शाळेचे मुख्याध्यापक श्री मारमवार सर यांच्या नियोजनाखाली अत्यंत उत्साहाच्या वातावरणात स्वयंशासन दिन पार पडला .इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेशजी देवकते, सदस्य श्री पिराजीराव धुळगंडे तसेच गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी यावेळी शाळेत येऊन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. श्री जाधव सर, श्री चापलवाड सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री मारमवार सर यांनी “याजसाठी केला होता अट्टहास”या मन:स्थितीतच आपल्या मनोगतात समाधान व्यक्त करून मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .मुलांना वरण-भात व जिलेबीचे जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मारमवार सर ,श्री जाधव सर, श्री चापलवाड सर ,श्री भोसले सर, सौ .राठोड मॅडम ,सौ. सिंदीजवळगेकर मॅडम,सौ. गादगे मॅडम,श्री राम कोये ( शा. व्य. समिती सदस्य) यांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post