
उदगीर /कमलाकर मुळे :
येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर गेल्या नऊ वर्षापासून हत्ती बेटावर होत असल्यामुळे हत्ती बेटाच्या विकासात या महाविद्यालयाचा खारीचा वाटा असून ,शिबिरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देवर्जन चे सरपंच अभिजीत साकोळकर यांनी दिले.उदगीर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान मौजे देवर्जन हत्ती बेट तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन देवर्जन हत्तीबेट येथील सरपंच अभिजीत साकोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शेष नारायण जाधव होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी देवर्जन ग्रामपंचायत चे सदस्य विनोद रोडगे ग्रामविकास अधिकारी भीमराव महांडोळे ,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष ज्योति बानापुरे,रणजीत बाणापुरे, पत्रकारिता तथा परीक्षा विभागाचे प्रमुख प्राध्यापक राहुल पुंडगे, संगणक शास्त्र विभागाचे प्रभारी प्रा.राशीद दायमी, प्रा.वैष्णवी गुंडरे, प्रा.रोहिणी रोडगे राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी स्नेहा कोनाळे, सुयश स्वामी यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या उद्घाटनिय मनोगतात सरपंच अभिजीत साकोळकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर गेल्या नऊ वर्षापासून हत्ती बेटावर होत असल्यामुळे हत्ती बेटाच्या होत असलेल्या हत्ती बेटाच्या विकासात या महाविद्यालयाचा खारीचा वाटा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमर तांदळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल उंडगे यांनी मानले..
Discussion about this post