
सिल्लोड प्रतिनिधी,
तालुका भाजपाअध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य, यांच्या सूचनेप्रमाणे पक्ष बळकटीसाठी मतदार संघातील 1000 सदस्य नोंदणी अभियानात अल्प कालावधीमध्ये योग्य कामगिरी बजावल्याबद्दल अभिनंदनपर प्रमाणपत्र बहाल केले. पत्रात नमूद करण्यात आले आहेत की, जागतिक कीर्तीचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविणे, भाजपा तालुका अध्यक्ष म्हणून आपले असलेली सामाजिक बांधिलकी, पक्षाच्या ध्येय धोरणाशी निगडित जनतेमधील सुसंवाद, जनता व सरकार यातील दूत म्हणून असलेली योग्य कामगिरी., पक्षाशी असलेली एकनिष्ठता , भारत राष्ट्राच्या पुननिर्माणाचा हेतू पूर्ण करण्यामध्ये आपले असलेले वेळोवेळीचे योगदान पक्ष कार्याला बळकटी देणारे. अशा आशयाचा मजकूर अभिनंदन पर पत्रामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
“पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून, वर्षांचे वेळोवेळी असलेले मार्गदर्शन, समवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ, मदत, जनतेला सदैव मदत करण्याची प्रांजळ व निस्वार्थी भावना यामुळेच प्रदेशाध्यक्षांची कौतुकाची थाप तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या, मतदारांच्या चरणी अर्पण
- अशोकदादा गरुड (भाजपा तालुका अध्यक्ष सिल्लोड.)
Discussion about this post