वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय श्री. प्रकाश आंबेडकर जी यांची आज नियोजित दौऱ्यानिमित्त लातूरकडे जाताना भेट झाली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला पंकजाताई मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती-शाहु-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र राज्यात हा वारसा-विचार चालवायला गेला पाहिजे.सर्वधर्मसमभाव, राज्यघटना नुसार देश चालवणं व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसांच्या सामाजिक न्याय व हक्कासाठी घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढा अविरतपणे चालू ठेवणं आवश्यक आहे.
Discussion about this post