निलंगा:- युवा पिढीमध्ये बदल घडण्यासाठी व व्यसनापासून दूर राहण्यासाठी दरवर्षी पहिल्या दिवशी व्याख्यान/ कीर्तन सेवा ठेवत आहे,कीर्तनसेवा ह.भ. प.ज्ञानेश्वर जांभळे महाराज आळंदीकर यांची कीर्तन सेवा ठेवण्यात आली व कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून औराद शहाजानी ठाणे चे ए.पी.आय.विठ्ठल धुरपडे उपस्थित होते. लहान मुलांचे व मुलींचे त्यांच्यामधील सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी कला,नृत्य व भाषण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम करून लहान मुलांना या समितीतर्फे प्रोत्साहन व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या संस्कृती कार्यक्रमांमध्ये जि. प. केंद्रीय प्रा.शाळा होसूर व महात्मा फुले विद्यालय होसुर, जि. प.चिचोंडी, जि. प.नदीवाडी, जि. प.हंसनाळ, जि.प.अंबुलगा बु., जि. प.हासली(तु), जि.प. हालसी (तांडा), जि. प.बोटकुळ, माऊली प्रायमरी इंग्लिश स्कूल या सर्व शाळेमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या सर्व शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व तीन दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी करण्यात आला पहिल्या दिवशी कैलासवासी चंद्रकांत विठ्ठलराव बिरादार यांच्या स्मरणात अमोल चंद्रकांत बिरादार यांनी महाप्रसादाचे नियोजन केले व दुसऱ्या दिवशी सार्वजनिक शिवजयंती कमिटी यांनी केले व तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर असोसिएशन होसुर यांनी अन्नदान ची सेवा केली व तसेच या चार दिवसांमध्ये पाण्याची भरभरातून सेवा सह्याद्री एक्वा कूल यांनी केली. कार्यक्रमाची सांगता न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती महाराज यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता केली.
Discussion about this post