

प्रतिनिधी : सचिन कोयरे..
येथील श्री.संत गजानन महाराज विश्वस्त समिती व समस्त ग्रामवासी अकोला बाजार यांनी श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात,भक्तीमय वातावरणात साजरा केला.यावेळी सकाळी श्रींचा अभिषेक करून होम हवन करण्यात आला.दुपारी हभप विजय महाराज ढाकुलकर आणि हभप विजय महाराज वाघाडे तसेच त्यांचे सहकारी यांच्या साथ संगतीने काल्याचे कीर्तन झाले.
सायंकाळी गावात माउलींची पालखी शोभायात्रा काढण्यात आली.या पालखी शोभायात्रेत अकोला बाजार परिसरातील विविध भजन मंडळीनी सहभाग घेऊन हाती झेंडे टाळ, पकवाज आणि नामाचा गजर करीत संपूर्ण गाव भक्तीमय केले.आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला.यासाठी गावातील संपुर्ण नागरिकांनी आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली.
भक्ती हीच शक्ती
पकवाज वादक चिमुकल्याने नागरिकांची मने जिंकली.
हातगाव येथील महेंद्र गज्जलवार यांचा मुलगा हभप सार्थक गज्जलवार या तेरा वर्षाच्या चिमुकल्यांने भजनी लयबद्ध पकवाज जवळपास तीन तास सतत वाजवून गावातील नागरिकांची मने जिंकली.
Discussion about this post