प्रतिनिधी:- विलास फड
आज महाराष्ट्रातील एकूण 20 लाख घरकुलास मंजुरी व 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्त्याचे वितरण मा. श्री.अमितजी शहा – गृह व सहकार मंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीत मा. श्री.देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्री. एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री,मा. श्री. अजित पवार – उपमुख्यमंत्री, मा. श्री. जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, मा. श्री. योगेश कदम – राज्यमंत्री ग्रामविकास यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील 1लाख 20 हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले,यासोबतच ग्रामविकास विभागाच्या विविध योजनेची यावेळी सांगण्यात आली यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व महिलांनी स्वयं सहाय्यता समूहात सहभागी व्हावे असे सांगण्यात आले तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना सुरुवात केल्याचे गृहमंत्री मा. श्री.अमितजी शहा यांनी आपल्या संभाषणात नमूद केले. यावेळी डॉ. श्री.अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य यांनी राज्यात घरकुल चा पहिला हप्ता वितरणात नांदेड जिल्हा द्वितीय क्रमांक मिळवल्या बद्दल श्रीमती मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व डॉ. श्री. संजय तुबाकले यांचे अभिनंदन व कौतुक केले यावेळी श्रीमती मीनल करणवाल – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, श्री. संदीप माळोदे -अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. श्री. संजय तुबाकले -प्रकल्प संचालक, श्री. राजकुमार मुक्कावार -उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा. प्र. विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड चे सर्व कर्मचारी तसेच लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post