57 Total Views , 1 views today

सोयगाव..
तालुक्यातील सावळदबारा येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक पाण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. देव्हारी – पिंपळवाडी येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर देव्हारी येथील काही शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी अनधिकृत नळ जोडणी केली आहे.त्यामुळे गावास कमी दाबाने पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
या प्रकाराची ग्रामपंचायत सावळदबाराच्या सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यावर काहीही कारवाई न करता २४ तास पाणी सुविधा देण्यात येत आहे. पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळदबारा ग्रामपंचायतची मालकीची असतांना देव्हारी येथील शेतकरी अवैधपणे २४ तास सर्रासपणे शेतीला पाणी घालत आहे.त्यामुळे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकी भरण्यास अडचण होते. साठवणूक टाकीत पाणी येत नसल्याने गावास आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे.त्यामुळे गावात कृत्रिम.पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन करणाऱ्या शेतकर्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.दरम्यान कारवाई होत नसल्याने ग्राम पंचयतीने आर्थिक देवाण- घेवानितून अवैद्य नळ कनेक्शन दिल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.
याप्रकरणी पंचायत समिती,जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोट :
मार्च महिना लागण्यास बोटावर मोजण्याइतके दिवस असून एन उन्हाळ्यात गावास तीव्र पाणी टंचाईला समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी मुख्य जलवाहिनीवर वॉल तोडून अवैध नळ कनेक्शन घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे.वेळीच ग्रामपंचायतीने या प्रकारास आळा घालावा.
दिलीप मोरे
सामाजिक कार्यकर्ता सावळदबारा..
Discussion about this post