
संत निरंकारी मंडळ नवी दिल्ली शाखा चामोशी द्वारा आयोजित
स्वच्छ जल – स्वच्छ मन,द्वारे मार्कंडा देवस्थान येथील नदीपात्राची केली स्वच्छता.
चामोर्शी: दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, संत निरंकारी मंडळ नवी दिल्ली शाखा चामोर्शी तथा भारत सरकार च्या सांस्कृतिक मंत्रालय याच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ” स्वच्छ जल ,स्वच्छ मन ,या उपक्रमाद्वारे मार्कंडा देवस्थान येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात सदगुरू प्रार्थना द्वारे करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक सौ मोगरे मॅडम सरपंच मार्कंडादेव, अध्यक्ष ब्रांच मुखी अशोक बोरकुटे, प्रमुख अतिथी भोजराम लंजे संचालक, देवनाथ धोडरे,फुलचंद गेडाम, निरंजना रामटेके प्रफुल गव्हारे वंदना धोडरे, विद्या बोरकुटे संभाजी भूरसे, नामदेव गव्हारे , सुरेश बावणे ,सुधाकर लोणारे होते.
संत निरंकारी मिशन हे अध्यात्मिक मिशन असून ब्रह्मज्ञानाद्वारे माणसात ईश्वराचे रूप पाहून मानवतेचे कार्य अविरतपणे करीत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत भारतातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे . यावर्षी भारतातील जवळपास साडेतीन हजार ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत वॉटर बॉडीची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी २०२५रोजी मार्कंडादेव येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदी घाटावर नदी घाट परिसर व पाणी पात्राची स्वच्छता करण्यात आली . मार्कंडा देवस्थान नदीघाट परिसराची व नदीपात्राची स्वच्छता करण्याचे शाखा चामोर्शी चे तिसरे वर्ष आहे.स्वच्छ जल ,स्वच्छ मन उपक्रमामध्ये शाखा चामोर्शी अंतर्गत सुमारे सातशे साध-संगत व सेवादल महात्मा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपक्रमांमध्ये सर्वांसाठी लंगर व चाय नाष्टा ची व्यवस्था शाखा चामोर्शी च्या वतीने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घनश्याम बोदलकर,नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, कल्पना सातपुते, रूपचंद कुमरे महेंद्र बोरकुटे, आशुतोष कोठारे, पियुष बोद्दलकर, बालाजी गव्हारे ,संतोष आलेवार ,संतोष वडेंगवार सुभास मिटपलीवार,प्रमोद देवगिरकर,प्रमोद सातपुते ,घनश्याम वासेकर श्री कडस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी चे संचालन श्री भोजराम लंजे प्रास्ताविक विद्या बोरकुटे आभार प्रदर्शन वंदना धोडरे यांनी केले..
Discussion about this post