
उदगीर /कमलाकर मुळे :
किनी यल्लादेवी तालुका उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली. यावेळी नैसर्गिक शेती या विषयावर श्याम सोनटक्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी सरपंच संतोष बिरादार, उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर, माजी सरपंच जीवनराव बिरादार ,पोलीस पाटील ज्ञानेश्वर नारागुडे ,एस .डी .कांबळे, बालाजी बिरादार यांची उपस्थिती होती.यावेळी शिवचरित्रावर आधारित भाषण स्पर्धेत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पहिले ते चौथी गटात स्नेहल जाधव-प्रथम ,अधिराज मुळे द्वितीय, ईश्वरी मुळे तृतीय आली. पाचवी ते सातवी गटात ममता कदम प्रथम, संजना कांबळे द्वितीय, प्रांजल कांबळे तृतीय आली, तर आठवी ते दहावी गटातून प्रशिका कांबळे प्रथम,सगुण देवकते द्वितीय, आशिया शेख ही तृतीय आली.सूत्रसंचालन व आभार राजेश्वर बिरादार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवजयंती समिति अध्यक्ष धोंडीराम रडगिरे, विजयकुमार बिरादार, महेश पाटील, नागेश देवकते, दत्ता मुळे, गिरीराज मुळे ,चैतन्य मुळे, यांच्यासह समितीच्या सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले..
Discussion about this post