
गेवराई प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील नामांकित असलेले कॅफे कॉर्नर यांच्या वतीने शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये बीड शहरातील शेकडो रक्तदात्यांनी आणि कॅफे कॉर्नर, माने कॉम्प्लेक्स, चाणक्य पुरी, शेजारी कॅफे कॉर्नरच्या बीड येथील असंख्य ग्राहकांनी या शिवजयंती निमित्त रक्तदान करून आपले महत्वाचे योगदान दिले आहे. या रक्तदान शिबिरातून सामान्य गरजू रुग्णांना फायदा व्हावा या उद्देशाने बीड शहरातील कॅफे कॉर्नर यांनी हे शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये आपले महत्त्वाचे योगदान देणारे रक्तदाते विकी वडमारे, शक्ती कुलथे, यश कुटे, रोहित गुंजाळ, अथर्व देशमुख, सारंग जावळे, आकाश डोके, संकेत कुटे, राहुल कुटे, शहादेव शिंदे,सूरज पूर्भे, ज्ञानेश्वर माने, सम्यक पारवे, अभिषेक कुटे, वेदांत ठिगळे, यश कुठे व आयोजक, कॅफे कॉर्नर, माने कॉम्प्लेक्स, चाणक्य पुरी, शेजारी बीड यांनी तसेच मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित लावून आपले योगदान दिले आहे..
Discussion about this post