


सुशील पवार , डांग..
डांग जिल्ह्यातील पौराणिक अर्धनारेश्वर नागेश्वर मंदिर बिलमाळ येथे 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक पूज्य साध्वी यशोदा दीदींच्या दिव्य वाणीत शिवपुराण कथेचे पठण करत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानसह विविध राज्यांतून लाखो भाविक पूज्य संत अणेकरूपी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. 12 ते 3 वाजेपर्यंत पूज्य साध्वी यशोदा दीदींच्या दिव्य प्रवचनात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी हरीपाठ, अभंग, कीर्तन, गोंधळ यासह कार्यक्रमाची सर्व व्यवस्था भावी भाविकांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. रसपान करून पुण्य चे ओझे प्राप्ती भाविक भक्तांनी घेतली..
Discussion about this post