उदगीर /कमलाकर मुळे: मराठवाडा स्तरीय शोध व उत्कृष्ट कार्य पुरस्काराचे वितरण डॉक्टर खासदार शिवाजीराव काळे व माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर येथे शनिवारी झाले. अध्यक्षस्थानी माहिती विभागाचे सहाय्यक संचालक श्याम टरके होते. यावेळी लोकमत परिवारातील संदीप शिंदे, बालाजी थेटे, बी.ए .कांबळे, बालाजी बिरादार यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच नवनाथ इधाते, गोकुळ पवार, सुशील देशमुख, संग्राम वाघमारे, सचिन चोबे, केतन ढवन, गोरख गुंजाळे,रवींद्र सोनवणे, संगम डोंगरे, बाबासाहेब उमाटे ,संजय पाटील, अंबादास जाधव शिवशंकर टाक, गणेश जाधव, युवराज धोत्रे यांनाही पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार यांनी पटवारी व चंद्रचकोर कारखाने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजकारणी व पत्रकार एकत्र येऊन समाजातील प्रश्नाची सोडवणूक करावी अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली .प्रस्ताविक राम मोतीपोळे यांनी सूत्रसंचालन प्रवीण जाहुरे यांनी केले. आभार प्रदर्शन रवी हसरगुंडे यांनी मानले.
Discussion about this post