
सुशील पवार ,डांग.
171-व्यारा विधानसभेचे आमदार मोहनभाऊ कोकणी, 173-डांग विधानसभेचे माजी आमदार मंगळभाई गावित, डांग जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विजयभाई डी. देशमुख व उपजिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विजयभाऊ खांभू यांच्या मान्यवर उपस्थितीत मंचाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात मंगळभाऊ गावित व मोहनभाऊ कोकणी यांनी शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. जे आज समाजाच्या विविध क्षेत्रात उच्च पदावर विराजमान आहेत. शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य, शाळेचे माजी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. तसेच माजी प्राचार्य मोहनभाई पटेल, नवलभाई ए. ठाकरे व इतर शिक्षकांचा चांदला व साल ओघडी देऊन सत्कार करण्यात आला.
या भव्य स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमात 2500 ते 3000 लोक उपस्थित होते, त्यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे समिती सदस्य यांनी उपस्थितांचे आभार मानले..
Discussion about this post