प्रा. दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील एका परीक्षा केंद्रावरील बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार परीक्षा केंद्रावर उघड झाल्यानंतर त्याबाबत केंद्राधिकारी आणि यंत्रणेने साखरखेर्डा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला .
सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा या ठिकाणी बारावी व दहावी ची परीक्षा शहरातील शिवाजी हायस्कूल, एस ईएस हायस्कूल, व जिजामाता विद्यालय या परीक्षा केंद्रावर सुरू आहे यंदा शासनाने परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाला आळा बसण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केलेले आहे .त्याचाच भाग म्हणून या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते. या केंद्रावर तीन माध्यमिक विद्यालये . तसेच गुंज येथील भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय, सहकार विद्या मंदिर, उर्दू हायस्कूल व अनिकेत सैनिक स्कूल मधील परीक्षार्थी दहावी व बारावी ची परीक्षा देत आहे .
21 फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यालयाच्या मागील परिसरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आले . यावेळी त्यांनी निरीक्षण केले असता. रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नाजधुस केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावरून त्यांनी तक्रार करून 21 फेब्रुवारी रोजी साखरखेर्डा पोलिसांच्या सदरबाब निदर्शनास आणून दिली साखरखेर्डा पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ताबडतोब अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला व तपास सुरू केलेला आहे. अद्याप पर्यंत गुन्हेगारांचा तपास लागलेला नाही अशी माहिती मिळते..
Discussion about this post