संजय फलके,शिरूर तालुका प्रतिनिधी
सरदवाडी ता. शिरूर येथील अभिनव विद्यालयात तब्बल १९ वर्षानंतर इयत्ता १० वी २००६ चे विद्यार्थी गेट टुगेदर च्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. प्रत्यक्ष वर्गात शाळा भरवून शिक्षकांसह गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घावटे डी. जी. सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप सरोदे सर यांनी केले.
Discussion about this post