


प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा..
तालुका प्रतिनिधी..
।। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ।।
।। तयाचा हारीक वाटे देवा ।।
सिनखेडराजा तालुक्यातील जवळच असलेल्या मौजे बाळ समुद्र येथील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय साहेबराव मेरत,वय ६३ वर्ष हे शेतकरी नुकतेच ३६०० किमी.ची पायदळ नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण करून आज ता .२२ रोजी गावी परतले आहेत.गावी परतले असता त्यांचे गावातील सर्वच स्त्री-पूरूष,युवा अशा सर्वच लहान थोरांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर घरासमोर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून पूजन करून आशिर्वाद घेतला. दत्तात्रय मेरत यांची
ही ३६०० किमी.ची पवित्र नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्यांना ३ महिने ६ दिवस लागले. ता.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरील श्री क्षेत्र ओंकारेश्वर पासून त्यांनी आपली परिक्रमा सुरु केली होती.ओंकारेश्वर हून गुजरात मधील भडोच येथे व नंतर नर्मदा अरबी समुद्रात मिळते त्या ठिकाणी जहाजातून उत्तर तटावरील पैलतिर गाठून उत्तर तटावरील अमरकंटक येथे पोहोचले.व अमरकंटक हून परत ओंकारेश्वर ला परतून ३६०० किमी ची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर २०२४ ला सुरू झालेली त्यांची नर्मदा परिक्रमा यात्रा माघ कृ अष्टमी म्हणजे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्ण झाली.ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्यांना ३ महिने ६ दिवस लागले.या परिक्रमेसाठी त्यांना मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतील १६ जिल्ह्यातून जावे लागले.परिक्रमेच्या मार्गावर प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी ठिकठिकाणी भाविकांना राहण्याची, खाण्याची व स्नानाची सोय सेवाधाऱ्यांनी केली होती. ता परिक्रमेत त्यांना हरि चैतन्य स्वामीजींचे परम् भक्त रूपराव सावळे पाटील (डोंगर खंडाळा) तसेच अहिल्यानगर व पूणे येथील एक भाविक अशी चौघांची सोबत होती. एवढ्या प्रदीर्घ प्रवासात ईश्वर कृपेने कुणालाही तब्येतीची कोणतीही तक्रार आली आली नाही असे दत्ताभाऊ मेरत यांनी सांगितले.
वडिलोपार्जित धार्मिक वारसा जपला
दत्तात्रय मेरत यांचे आजोबा स्व. देवराव मेरत (साधुबा ) चाळीस -पन्नास वर्षा पूर्वी चार धामापैकी यापैकी एक धाम असलेल्या तिर्थक्षेत्र द्वारकेला जाऊन आले होते.त्यांना देवराव साधूला असे नाव पडले.त्या काळी वाहतुकीची व संपर्काची फारसी साधनं नव्हती. घर सोडल्यावर परत येईपर्यंत कोणत्याच माध्यमातून संपर्कांची साधने नसल्याने यात्रेकरू घरी परते पर्यंत चिंता वाटत असायची.
.त्यामुळे दूरवरची यात्रा पूर्ण करून यात्रेकरू सुखरूप घरी परत आल्यावरच कुटुंबातील सदस्यांना अपार आनंद होत असे आणि हा आनंद नातेवाईक,भाविक तथा गावकऱ्यांना मावंद्याचे प्रासादिक जेवण देऊन पूर्ण केले जात असायचे.
. आजोबांची परंपरा कायम ठेवत.पुढे वडील…स्व. साहेबराव देवराव मेरत (मामा ) यांनी आपला वडिलोपार्जित ठेवा जपून दरवर्षी पंढरपूर वारी,माहुर गड वारी केली. गावातील त्यांच्या वयाच्या व्यक्तींना सोबत घेऊन अयोध्या, मथुरा,काशी विश्वेश्वर, जगन्नाथ पुरी, रामेश्वर धाम केले.प्रसंगी भाविकांना आर्थिक मदत सुध्दा केली.
हीच परंपरा कायम ठेवत स्व.साहेबराव मेरत मामा यांचे सुपुत्र व बाळसमुद्र गावचे पोलिस पाटील
श्री दत्तात्रय साहेबराव मेरत पाटील (बाप्पू ) गेली ३ महिने ३६००कि.मीटरचा पायी प्रवास करत हिवाळा ॠतु असताना नर्मदा परिक्रमा पूर्ण करुन आज दि. २२/०२/२०२५ रोजी बाळसमुद्र गावी सुखरूप पोहोचले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने दत्तात्रय मेरत यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल अभिमान वाटला.त्यांचे भावपूर्ण स्वागत हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सध्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावाहून भाविक, नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रमंडळींची रीघ लागली आहे.
@फोटो-साखरखेर्डा/- प्रदीर्घ व खडतर नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण करून गावी पोहोचलेल्या दत्तात्रय मेरत यांचे स्वागत करतांना गावकरी..
Discussion about this post