
(ता.प्र) शेख मोईन..
नगरपरिषदेतील तीन पदांची जबाबदारी एकाच कर्मचाऱ्यावर दोन दिवस हिमायतनगर नगर पंचायतीची जबाबदारी.
किनवट : किनवट नगर परिषदेचे पाणीपुरवठा
अभियंता भालेराव यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक स्वच्छता, निरीक्षक आणि शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तीन जबाबदाऱ्या दिल्या असतांना आठवड्यातून दोन दिवस हिमायतनगर नगरपंचायतीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे किनवट शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत दैनिक देशोचतीने सातत्याने वृत्त प्रकाशित केले.
शहराच्या मुख्य रस्त्यावर भाजी मार्केटच्या प्रवेशाच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत. भाजी मार्केटच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर सुकी मच्छी अर्थात
बोंबील मासोळीचे दुकान एका विक्रेत्याने अनधिकृतपणे रस्त्यावरच थाटले. त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या दुर्गंधीमुळे महिला सहित अनेकांनी भाजी मार्केटमधील हा रस्ता बंद केला, एकाने अतिक्रमन करून पोट कीरायादाराला ३ हजार रुपये प्रतीमहीणा दिले तर दुसऱ्या रस्त्यावरून कचऱ्याच्या सडक्या ढिगावरूनच नागरिकांना भाजी मार्केटमध्ये ये-जा करावी लागल आहे. नगर परिषद सध्या प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळे आणि तेही प्रशासक आणि मुख्याधीकारी एकच आहेत पाच दिवसाचा आठवडा असतांना ते पुर्णदिवस कधीच कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी गंभीर बाबीची दखल घेऊन शहरवासीयांना किमान मूलभूत सुविधा तरी मिळवून द्याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत..
Discussion about this post