खरे आरोपी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम हेच असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
लाजलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पथकाने R.T.O. च्या सीमा नाका लक्कडकोट येथे एका ट्रक चालकाकडून ५०० रुपयाची लाज घेताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एक खाजगी एजंटला दि .२१/०२/२०२५ ला रंगेहात अटक केली होती. दरम्यान राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु R.T.O. च्या लक्कडकोट सीमा नाका वसुली करण्याच्या आदेश हे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी दिले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे, त्यासाठी सत्यता पडताळणी करायची असेल तर अटक झालेल्या सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी यांनी लाजलूचपत विभागाचे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
दरम्यान या एसीबी च्या कारवाहीत मोटर वाहन निरीक्षक गोविंद पवार यांना परस्पर सोडण्यात आल्याची चर्चा असून आरोपी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांची सुद्धा जमानत रविवारला झाल्याने या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची कुजबूज सुरू आहे. या प्रंकरणी मनसे वाहतूक सेनेकडून किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी लाजलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने किरण मोरे सह आनंद मेश्राम यांना अटक होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे .
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचे मॉडेल बनले असून या मॉe परतिबंधात्मकडेलचा खरे हिरो प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आहेत तर दुसरे साईड हिरो R.T.O. अधिकारी आनंद मेश्राम हे आहेत, त्यांच्याच आदेशाने केंद्र शासनाने बंद केलेल्या लकडकोट येतील सीमा नाक्यावर बेकायदेशीरपणे हजारो हायवा ट्रक व जड वाहन चालकाकडून चालकाकडून एन्ट्री फि च्या नावावर प्रत्येक वाहन ५०० ते १००० रुपये येथे ड्युटीवर असलेल्या R.T.O. वाहन निरीक्षक , सहायक निरीक्षक व त्यांनी नियुक्त केलेल्या खाजगी एजंट यांच्या माध्यमातून गोळा केले जातात.
हा गोळा झालेला प्रत्येक दिवशीचा पैसा जवळपास ३ ते ५ लाख एवढा गोळा होतो. अशाच प्रकारे प्रत्येक ट्रक चालक का कडून ५०० घेताना अमरावती एसीबी च्या पथकाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंटला दिनांक २१/०२/ २०२५ ला लाज घेताना रंगेहात अटक केली होती.
परंतु या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक गोविंद पवार या R.T.O. अधिकारी यांचे नाव गुन्ह्यात असायला हवे पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसल्याचे कळते, दरम्यान या प्रकरणात आरोपी शिवाजी विभुते यांची नार्को टेस्ट केल्यास खरे आरोपी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांची नावे समोर येऊ शकते,कारण त्याच्या आदेशानेच ही अवैध वसुली सीमा नाक्यावर सुरू असल्याचा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे .
Discussion about this post