
*’तो’ खड्डा बुजवण्याचे नगरपालिका प्रशासनाचे आश्वासन..!**सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेधले लक्ष… लक्ष्मीनगर येथे डॉक्टर सावंत यांच्या दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीठ्यावर गेली चार चार वर्षांपूर्वी रस्त्याच्या मध्यभागी लहान खड्डा पडला होता त्याचे रूपांतर आता मोठ्या खड्ड्यात झाले असे तेथील रहिवाशांनी सांगितले. खड्ड्यातून खडी व मोठमोठे दगड बाहेर पडून अपघाताच सत्र सुरू आहे. काल रात्री सदर खड्ड्यामध्ये महिलेची मोटरसायकल स्लीप होऊन या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली या गोष्टीची गंभीर दखल घेऊन शहरामध्ये झिरो अपघात मिशन राबवणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे व त्यांचे सहकारी यांनी घटना स्थळी जाऊन सदर रस्त्याची पाहणी करून नगर परिषदेचे लक्ष वेधून नगरपालिका बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांना घटनास्थळी बोलून घेतले व तत्काळ खड्डा बुजवण्याचे काम हाती घेऊन येथील रहिवाशांना सहकार्य करा अशी मागणी केली अन्यथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा खड्डा आजच्या दिवशी बुजवला जाईल असेही सांगण्यात आले. त्यावर नगरपालिका बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी आजच्या दिवशी हा खड्डा बुजवला जाईल अशी ग्वाही दिली. त्या प्रसंगी रवी जाधव लक्ष्मण कदम रुपा मुद्राळे व अमित सावंत व तेथील रहिवाशी उपस्थित होते.
Discussion about this post