
दुबई येथे महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार..
आखाती देशात स्थायिक मराठी माणसांसाठी महाराष्ट्र सदन महत्त्वाचे ठरणार..
जय भवानी जय शिवाजी घोषणांनी अबुधाबी परिसर दुमदुमला..
प्रा. दिलीप नाईकवाड
सिदंखेडराजा : तालुका प्रतिनिधी
दुबई येथील अबुधाबी या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्सवा साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे काढले. आखाती देशात स्थायिक झालेल्या भारतीय नवीन पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्ञात असावा यासाठी अशा जयंती सोहळ्याच्या आयोजनाची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते होते. याप्रसंगी मालोजीराजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती.
कार्यक्रमाचे आयोजन दुबईतील इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व स्थानिक भारतीय रहिवासी यांनी हिंदू मंदिर या ठिकाणी संयुक्त विद्यमाने केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगत छत्रपतींनी आपल्या राजवटीत लोक हिताची कामे केली. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. त्यांचाच आदर्श समोर ठेवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात लोक हिताची कामे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी अबुधाबी तील मराठी माणसासमोर संवाद साधत असतानां सांगितले. अबुधाबीत मराठी कुटुंब मोठ्या संख्येने भगवे फेटे व महीला भगीनी भगव्या साड्या परिधान करून उपस्थित होत्या .आखाती देशातील स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्रित येऊन सामाजिक कार्यक्रम साजरे करता यावे. यासाठी महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांनी मराठी माणसाशी संवाद साधताना सांगितले. सातासमुद्रा पलीकडे शिवजयंती साजरी होणे ही बाब तुमच्या आणि आमच्यासाठी स्वाभिमानाची आहे. यावेळी उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी प्रतिसाद देऊन कार्यक्रम संपवला..
Discussion about this post