
धारणी=मेलघाट विधानसभा मतदरसंघाचे माजी राज्य मंत्री स्व.दयारामजी पटेल यांच्या पत्नी व मेलघाट चे माजी आमदार राजकुमार पटेल तसेच जि. प. अमरावतीचे माजी उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल यांच्या मातोश्री माजी जी. प.सदस्या श्रीमती गंगाबाई दयाराम पटेल रा. झिल्पी यांचे रविवारी रात्रि 11.50 ला दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी ,सुना, नाटवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा दूपारी एक वाजता झिल्पी येथून निघाली व आमनेर किल्ला तापी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले..
Discussion about this post