
मलकापुर :
समाजसेवा म्हणजे केवळ गरीब आणि गरजूंना मदत करणे नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा एक सुंदर प्रयत्न हनुमान सेना करत आहे. समाजसेवा ही केवळ दानधर्मासाठी नसून, ती समाजाचे हित, कल्याण आणि प्रगती साधण्यासाठी केली जाते. समाजातील प्रत्येक घटकाला योग्य संधी, मदत आणि आधार देणे हाच हनुमान सेनेचा उद्देश असतो. ही सेवा स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर इतरांसाठी केली जाते.समाजसेवा हा जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन समाजसेवेसाठी प्रयत्न केले तर आपला देश अधिक प्रगतशील, सुसंस्कृत आणि समृद्ध होईल. आपल्याला मिळालेली संधी, आपले कौशल्य, आपले विचार हे केवळ स्वतःपुरते न ठेवता समाजहितासाठी वापरले पाहिजेत. समाजसेवा हा आपल्या मनाचा आणि समाजाचा दुवा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी हे दान करण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.मलकापूर तालुक्यात अलीकडच्या काळात नावारूपास आलेली हनुमान सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना दीनदुबळ्यांसाठी मदत करत असते रक्तदान, हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार, युवा वर्गांना स्वयम् रोजगार उपलब्ध करून देणे, युवा वर्गांना अध्यात्माकडे वळवणे हे कार्य हनुमान सेना नियमितपणे करत असते त्यामुळे अशा संघटनेचे मनोबल वाढवण्यासाठी वेळोवेळी त्यांना सन्मानित केले जाते 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मलकापूर तालुक्यातील आयोजक आई तुळजाभवानी फाउंडेशन यांच्यातर्फे अशा सामाजिक संघटनेचा गुणगौरव करण्यात आला हनुमान सेना या सामाजिक संघटनेला सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदान केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले..
Discussion about this post