सिंदखेडराजा
प्रा. दिलीप नाईकवाड तालुका प्रतिनिधी
- राजलक्ष्मी इंटरनेशनल स्कूलमध्ये आजी-आजोबा नातवंडांचा कृतज्ञता सोहळा.
- आजी-आजोबांची पाद्य पूजा, औषण व पुष्पवृष्टी सोहळ्याची सर्वत्र चर्चा व कौतुक.
- आजी- आजोबासह नातवंडाच्यां हातात ग्रामगिता देवून संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संकल्प.
आजच्या काळात घरात वयस्क आईवडील, आजी आजोबा ओझ वाटतात. अशा परिस्थितीत देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये चक्क आजी आजोबा सोबत नातवंड चक्क नातवंड आजी-आजोबाला बोटाला धरून आपल्या शाळेत आणतात आणि पाद्यपुजन करून औक्षण करतात व पुष्पवृष्टी करतात हा सन्मान मिळाल्याचे पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कांताबाई पालोदकरआजी भावूक झाल्या आणि अशा प्रकारे प्रत्येक शाळेत शिक्षणासोबत संस्कार दिले गेल्यास महाराष्ट्रातच काय देशात वृद्धाश्रमाची फित कापण्याची वेळच येणार नाही. असे भावपूर्ण उद्गार पालोदकर आजीने काढले. देशातून कुभंमेळाव्यात प्रयाग राजला ६० कोटीच्यां जवळपास भावूक भक्तानीं डुबकी मारली व पापमुक्त होवून मोक्षाचा मार्ग मोकळा कोलाही असेल परंतू आपल्या घरातील आईवडील, आजी-आजोबा यांना ओझ न समजता त्यांचा सांभाळ करणारे किती असतील .याबाबत न बोललेलच बर अशा परिस्थिती देशातील शाळा शाळा मधून संस्कारांचे बाळकडू बालवयातच पाजल्यास संस्कारक्षम पिढी देशाला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही.
इंटरनॅशनल स्कूल मधील नातवंड- आजी -आजोबा यांच्या भावपूर्ण कार्यक्रमात सर्वच उपस्थित भावूक झाले. जुन्या पिढीत आजी-आजोबा नातवांवर संस्कार करत .त्यांना छान छान गोष्टी सांगत. परंतू आजच्या आधुनिक युगात नातवंडाच्या हातात मोबाईल आहे. आजी आजोबांच्या मायेचा स्पर्शही त्यांना नाही आणि त्यांच बालपणच करपलं जातंय असेही काही आजी आजोबा म्हणाले..
कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी संस्कारक्षम नवीन पिढी घडवण्यासाठी आम्हाला सर्वचस्तरातून सर्वाकडून सहकार्य मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थितांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता संस्कारक्षम ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आला. कार्यक्रमाला राज लक्ष्मी इंटनॅशनलच्या अध्यक्षा डॉ. मीनल शेळके,सीईओ सुजित गुप्ता, प्राचार्या डॉ. प्रियका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रतीक्षा इंगळे व मनीषा जगताप यांनी केले. कार्यक्रम आयोजन यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यानीं परीश्रम घेतले. या कृतज्ञ पूर्ण सोहळ्याने आजी-आजोबां आणि नातवंड यांच्या चेहयावर हसू आणि आनंद दिसत होता. या उस्फूर्त आणि नाविन्यपूर्ण सोहाळ्याची संपूर्ण देउळगावराजात चर्चा आहे.
Discussion about this post