महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक – दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत सादरीकरणाची संधी
अहिल्यानगर, तालुका प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट हिने अभूतपूर्व यश संपादन करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या शाळेला आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रकल्प सादरीकरणाची संधी प्राप्त झाली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू इन्हान्स लर्निंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित C.S. हॅकेथॉन उत्सवात १५ जिल्ह्यांतील ५७,६०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४५ विद्यार्थी व १५ शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
बाबुर्डी घुमट शाळेचा अभूतपूर्व विजय
अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट शाळेच्या विद्यार्थिनींनी “कृषी मित्र” नावाच्या अभिनव प्रकल्पासह प्रथम क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा १९ ते २१ फेब्रुवारी २०२५ दरम्यान अमेझॉन कंपनी, पुणे येथे पार पडली. हा कम्प्युटर सायन्सवर आधारित प्रकल्प सादरीकरणाचा एक अनोखा इव्हेंट होता, जो विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरला.
“कृषी मित्र” प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
विद्यार्थिनी स्वाती परभाणे, भक्ती परभाणे आणि प्रांजली सांगळे यांनी मार्गदर्शक शिक्षिका वर्षा कासार (भालसिंग) यांच्या नेतृत्वाखाली “कृषी मित्र” मॉडेल तयार केले.
या प्रकल्पामध्ये –
✅ Soil Moisture Sensor वापरून ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टीम
✅ Ultrasonic Sensor वापरून शेतीचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण
✅ शेतीसाठी लागणारी वीज पवनचक्कीवर तयार करण्याचे तंत्रज्ञान
हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि अमेझॉन कंपनीच्या इंजिनियरनी या प्रकल्पाचे पेटंट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली.
स्पर्धेत मिळाले भव्य पारितोषिके!
या स्पर्धेत शाळेला एकूण १ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले, ज्यामध्ये –
💻 लॅपटॉप
📱 टॅब
🔊 ॲलेक्सा
💰 ₹१५०० चा चेक
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आणि मार्गदर्शक
या कार्यक्रमास शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते:
- श्री. राजेंद्र कांबळे, प्राचार्य, DIET जालना
- श्री. नदाफ बनकर, प्राचार्य, DIET अंबेजोगाई, बीड
- श्री. राजेश बनकर, प्राचार्य, DIET अहिल्यानगर
- श्री. प्रमोद कुमावत, वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET जालना
- श्री. अनिकेत नाटू, जनरल मॅनेजर, अमेझॉन
- श्री. अक्षय कश्यप, प्रमुख, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर (AFE)
- श्री. मधुकर रेड्डी बानूरी, संस्थापक संचालक, लीडरशिप फॉर इक्विटी
- श्री. इरफान ललानी, संस्थापक, कोड टू इन्हान्स लर्निंग
मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग
या यशाबद्दल मुख्याध्यापक नंदू धामणे, वर्गशिक्षक आबा लोंढे, वर्षा कासार, हेमाली नागापुरे, संजय दळवी, सोहनी पुरनाळे, राजेंद्र काळे, प्रिती वाडेकर, अपर्णा आव्हाड यांनी विशेष मार्गदर्शन केले.
🔹 व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परभाणे, उपाध्यक्ष सचिन भगत, सरपंच नमीता पंचमुख, उपसरपंच ज्योती परभाणे, केंद्रप्रमुख संजय धामणे, विस्ताराधिकारी निर्मला साठे, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, डायट प्राचार्य राजेश बनकर आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Discussion about this post