तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चंद्रपूर :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व मातोश्रीशी गद्दारी करुन निलम गोऱ्हे गरळ ओकत आहेत, याच्या निषेधार्थ आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व मराठवाडा संपर्क नेते सुनिल प्रभू व बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव , महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख गणेश वरेकर व जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मीराताई नवले यांच्या पुढाकाराने व शिवसेना तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन व उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निलम गोऱ्हेच्या प्रतिमेस जोडे मारुन तिवर आंदोलन करण्यात आले व यावेळी निलम गोऱ्हे हाय , हाय ,अशी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
,यावेळी बोलताना तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन व महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मीराताई नवले यांनी सांगितले की, ज्या निलम गोऱ्हेकडे स्वतःची स्कुटी बसायला नव्हती त्या निलम गोऱ्हेला 4 वेळा मातोश्रीने आमदारकी बहाल केली तिच निलम गोऱ्हे नमकहरामी निघाली , मातोश्रीने आतापर्यंत कित्येकांना रस्त्यावरचे मर्सिडीज गाडीवर बसवले आहे, शेकडो ल़ोकांना खासदारकी , आमदारकी , मंत्रीपदे दान केलेली आहेत, सर्वसामान्य गरिबांच्या पोरांना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख केलेले आहे , मातोश्रीने कुणाकडूनही एक रुपया कधी घेतला नाही ,अशा मातोश्रीवर गरळ ओकणे हास्यास्पद आहे असे सांगितले यावेळी उपतालुका प्रमुख अशोक सगळे, उपतालुका प्रमुख दादासाहेब सोनवणे,कामगार नेते रविअणणा वाघमारे, अर्जुन येवले ,मनिषाताई मुंढे,आशाताई कानडे,छाया धुताडमल, ज्योती डोळस ,प्रयागा वाघमारे,विमल धुताडमल , मनिषा कदम ,लंकाताई ठोंबरे,कांता घाडगे,कालिंदा घाडगे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post