नवीन नांदेड – ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास 77 देशी विदेशी दारू गुन्हा यातील जप्त केलेला मुद्देमाल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस अंमलदार यांनी पोलिस स्टेशन प्रांगणात 3 लाख 44 हजार 965 रूपयाचा देशी विदेशी दारू 25 फेब्रुवारी नष्ठ केली.
पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलीस स्टेशनचा जास्तीत जास्त मुद्देमाल निर्गतीचा आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचलोलकर व पोलीस अमंलदार यांनी महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी, (राज्य उत्पादन शुल्क विभाग) नांदेड यांचे कार्यालयाशी संपर्क करुन दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पो.स्टे. नांदेड ग्रामीण मुद्देमाल कक्षातील एकुण 77 प्रोव्हिशन गुन्हयांची माहीती घेवुन देशी व विदेशी दारु किमंती 3,44,965 रुपयाचे मुद्देमाल नष्ठ करण्याची कामगीरी केली आहे. पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीणचे ओमकांत चिंचोलकर यांच्या कामगीरीचे अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड,खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक,भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड,
सुशील कुमार नायक,उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग, इतवारा,नांदेड यांनी कौतुक केले आहे.मुद्देमाल नष्ट करण्यासाठी
ओमकांत चिंचोलकर,
पोलीस अमंलदार सपोउपनि, भगवान महाजन, मपोहेकॉ छाया मरेवाड यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post