नवीन नांदेड – तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी महाशिवरात्री निमित्ताने 26 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून य 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर 27 फेब्रुवारी रोजी हभप शैलेश महाराज कामठेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे, महाशिवरात्री निमित्ताने परिसरात यात्रेनिमित्त विविध खेळणी व महाप्रसाद दुकानासह खेळणी व भांडी दुकाने लागली असुन जिल्हाधिकारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक व नांदेड ऊतर व दक्षिण आमदार व मान्यवर दर्शनासाठी येणार असुन मंदिर परिसरात ग्रामपंचायत व विश्वस्त मंडळ व महसूल प्रशासन यांच्या वतीने मंडळ अधिकारी यांनी पाहणी केली आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे दि. 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून ह.भ.प. शैलेश महाराज कामठेकर यांच्ये काल्याचे किर्तन होणार आहे दि. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वा. अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ,काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानचा महाअभिषेक होईल. तसेच रात्र ते पहाटे या वेळेत इतर सर्वांचे नोंदणी पद्धतीने अभिषेक होतील,संगीत भजन रात्री 11 ते पहाटे होणार आहे.नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सह जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सह नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर व ऊतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सह अनेक मान्यवर दर्शनासाठी येणार आहेत.महाशिवरात्री निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारा अधिकारी, पन्नास पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त,व नदीकाठ किनारावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.
महाशिवरात्री यात्रे निमित्ताने भाविक भक्तांनी होणारी गर्दी पाहता काळेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, सचिव शंकरराव हंबर्डे कोषाध्यक्ष: उत्तमराव हंबर्डे सदस्य मोहनराव हंबर्डे,रावसाहेब हंबर्डे,धारोजीराव हंबर्डे,गणेश धनमणे, बालाजीराव हंबर्डे,सतिश भेंडेकर यांच्या सह माजी सरपंच राजु हंबर्डे व ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे व उपसरपंच सौ.अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांच्या सह ग्रामपंचायत यांच्या वतीने दर्शन रांगा व मंदिर व्यवस्था पाहणी केली आहे.तर महसूल विभागाच्या वतीने परिसरातील पाहणी मंडळ अधिकारी कानगुले यांनी केली आहे.
Discussion about this post