भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्रांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसुचित जाती व नवबौद्धांना शासकिय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरीता असते. परंतू शासनाने जाचक अटी निर्माण केल्याने या योजनेपासून अनेक विद्यार्थी लाभांपासून वंचित राहणार आहेत . त्यांमुळे वसतीगृहाच्या जाचक अटी रद्द करावे. तसेच वसतीगृहाची संख्या व विद्यार्थी पटसंख्या वाढवावी . त्यांच्या शिष्यवृत्या त्वरित बँकेच्या खात्यात जमा करावे . अशा विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले .
निवेदन देतेवेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे संजय गंदाटे , दिलीप नंदेश्वर , जयंत गेडाम , प्रमोद राऊत , प्रमोद राऊत व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Discussion about this post