प्रतिनिधी:- सोपान मोटे
जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केला होता . बाईच्या पदराला हात घालणाऱ्यास अवघ्या १६ वर्षाचे असताना शिक्षा सुनावणारा हा रयतेचा , स्त्रियांचा सन्मान जपणारा राजा पुन्हा होणे नाही ” , असे विचार शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले शिवजन्मोत्सवानिमित्त सोमवारी तापडिया नाट्यमंदिर येथे बानगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले . बानगुडे पाटील म्हणाले आजचे राजकारण हे अर्थकारणावर चालते . पण शिवकालीन राजकारण मूल्यावर आधारित होते महाराजांनी कोणत्याही धार्मिक स्थळावर आक्रमण केले नाही . महाराजांनी आपले कर्तृत्व आणि वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांनी राष्ट्रसमोर राष्ट्रीय चरित्र उभे केले . जगातील सर्वात जलद निवाडा महाराजांनी एका स्त्रीवर झालेल्या अत्याचारानंतर केला . आपल्या प्रत्येक मावळ्यांच्या समर्पणाची जाणीव ठेवताना महाराजांनी आपले स्वराज्य घडविले . तसेच व्याख्यानापूर्वी देवानंद माळी यांनी पोवाडा सादर केला आयोजक ॲड.दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमी सलग 12 वर्षापासून या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना दिसतात. एडवोकेट . दत्ता पाटील हुड व त्यांचे सर्व सहकारी मित्र मंडळ व त्यांच्या टीमचे सारथी महाराष्ट्र न्यूज तर्फे भरभरून आभार . त्यांनी १२ वर्षापासून चालवलेला शिवजन्मोत्सव असाच चालू राहावा हीच आई जगदंबे चरणीप्रार्थना
Discussion about this post