प्रतिनिधी:- भाऊ कोळपे
लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भरत दत्तात्रय काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळत्या सरपंच सविता गीताराम लांडगे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली ग्रामविकास अधिकारी एस एन गवारे यांनी निवडणूक कामकाजात सहकार्य केले सरपंच पदासाठी भरत काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी ज्येष्ठ नेते माधव का व यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साधना सहकारी बँकेची माजी अध्यक्ष सुभाष काळभोर व माजी जिल्हा परिषद विलास काळभोर पंचायत समिती माजी सभापती युगंधर काळभोर बाजार समितीचे माजी संचलक शिवदास काळभोर माजी सरपंच शरद काळभोर भोलेनाथ शेलार योगेश काळभोर माधवी काळभोर उपस्थित रतन वाळके माजी उपसरपंच ज्योती काळभोर संगीता काळभोर सदस्य गणेश कांबळे नागेश काळभोर उपस्थित होते.
Discussion about this post