- 28 राज्यांचे हे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष सहभागी होणार
- राज्यातील 36 जिल्हे व 355 तालुक्यांचा सहभाग
- महिला आघाडी व लिगल आघाडी उपस्थित राहणार
- राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान करणार नेतृत्व
- अध्यक्ष खलील सुर्वे, प्रदेशाध्यक्ष माने यांचा पुढाकार
प्रा. दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी :- पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी…. त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तसेच देशभरातील पत्रकारांना सरकारच्या दडपशाहीतून मुक्त करण्यासाठी… लोकशाहीचा चौथास्तंभ मजबूत करण्यासाठी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष सुधीर माने, राष्ट्रीय महिला महासचिव मानसी कांबळे यांच्या पुढाकाराने मे महिन्यात जळगांव येथे न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सचिव अनिल पवार यांनी दिली आहे.
पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासह 28 प्रदेश व 8 केंद्रशासित प्रदेशांचे प्रदेशाध्यक्ष या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत. देशविदेशातील पत्रकारांच्या समस्या…पत्रकार संघटनेची बांधणी…संघटनेचे ध्येयधोरणे, उद्देश…आदी विविध विषयांवर या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारांसाठी एकदिवसीय आंदोलन करण्याबाबतची दिशा देखील या अधिवेशनात ठरविण्यात येईल, अशी माहिती देतानाच संघटनेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय सचिव अनिल पवार यांनी केले.
या अधिवेशनाचे संयोजन राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख डॉं. शेखर जांभळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर माने, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, राष्ट्रीय सचिव अनिल पवार आदी करणार आहेत. अनिल कुमार पालीवाल, प्रदेश संयोजक, एन . जे. ए. मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे हे प्रसिद्ध केले आहे.
………………………………
Discussion about this post