
प्रा. दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा :तालुका प्रतिनिधी..
मातृतीर्थ सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते १०० घरकुल लाभार्थ्यांनां फेटे बांधून व गुलाब पुष्प देऊन प्रथम हप्त्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी सिंदखेड राजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश मस्के यांचे प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण भारतभर पंतप्रधान आवास योजना वेगाने कार्यरत करण्यासाठी महाराष्ट्र शासन व पंचायत राज विभाग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन २०२४-२०२५ चा १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांनां मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उपस्थितीत महाराष्ट्रात बालेवाडी पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
हा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री ना. अमित शहा यांचे शुभ हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख उपस्थितीत व मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे विशेष उपस्थितीत. तसेच जयकुमार मोरे ग्रामविकास मंत्री.व ना. योगेश कदम राज्यमंत्री ग्रामविकास पंचायत राज विभाग यांचीही कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती .
पुणे येथून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पूर्ण राज्यभर जिल्हास्तर ,पंचायत समिती स्तर, आणि ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून सिदंखेडराजा पंचायत समितीमध्ये या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सर्वांनी करून सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांनां विना विलंब ही योजना पोहोचणार असल्याचे सुतोवाच कार्यक्रमातून करण्यात आले..
Discussion about this post