
छत्रपती शिवाजी महाराज यांची वडवणी शहरात होत असलेल्या भव्य – दिव्य शिवजयंतीच्या अनुषंगाने शिवजयंती कमेंटी व अध्यक्ष संतोष दादा डावकर यांनी आज पत्रकार परिषेद घेतली,
28 फेब्रुवारी 2025 रोजी होत असलेल्या भव्य – दिव्य शिवजयंतीच्या निमित्ताने वडवणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, वडवणी शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्या कारणाने, वडवणी शहरात होत असलेल्या शिवजयंती निमित्ताने वडवणी शरातील व परिसरातील सर्व जाती-धर्मातील नागरिक व महिला यांची अफाट अशी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे ,
त्यांसाठी शिवजयंती कमेंटीने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे, या गर्दीची पुर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहिलं , त्याच शिवजयंती कमिटीने सुद्धा याबाबी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर तरुण शिवभक्तांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या आहेत , तसेच शिवजयंती निमित्ताने येणार्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे व सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद कसा घेता येईल यासाठी शिवजयंती कमेंटि खुप परिश्रम घेत आहे,वडवणी शहरातील शिवजयंती समितीचे अध्यक्ष,संतोष दादा डावकर यांनी, वडवणी पत्रकार परिषदे घेऊन वणी शहरातील व आसपासच्या सर्व ग्रमीण भागातील
सर्व जाती – धर्माच्या महिला व नागरीकांना शिवजयंती उपस्थित राहाण्याचे आव्हान केले आहे.
Discussion about this post