

शिरूर तालुका प्रतिनिधी..
रामलिंग यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ज्ञानेश्वर माऊली आबा कटके सोशल फाउंडेशन आणि श्री राम सेना शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३५०० हून अधिक भाविकांना महाप्रसाद आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रामलिंग रोड, जाधव मळा येथे खिचडी फराळ, फळे आणि मिनरल वॉटर यात्रेकरूंना देण्यात आले, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.
मान्यवरांची उपस्थिती या सेवाभावी उपक्रमाला शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा पाचर्णे, भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच अरुणराव घावटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद नाना कालेवार, युवा नेते सागर नरवडे, एजाज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री राम सेनेचे व आमदार- ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील दादा जाधव, स्वप्निल रेड्डी, महेंद्र यवले, संपत दसगुडे, बाळासाहेब गाडेकर,नगरसेवक निलेश गाडेकर,विरेंद्र आबा कुरंदळे, नयन पाचर्णे, सोनू नारखडे, रुपेश घाडगे, सुरज शिंदे पाटील, दिनेश पडवळ, मंगेश कवाष्टे, संपत दसगुडे, अविनाश जाधव, रणजीत गायकवाड, सुनील जठार, संजय बाबा ढवळे, सचिन राजे जाधव, यश गाडेकर, आशिष उबाळे, यश धनी, आकाश चोरे, सिद्धांत चव्हाण, पृथ्वीराज येवले, मयूर वाळके, साहिल ढवळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने अथक मेहनत घेतली.
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समाधान
या उपक्रमामुळे यात्रेकरूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फराळ आणि पाण्याची सुविधा केल्याबद्दल अनेक भक्तांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. भविष्यातही अशी सेवा सुरू ठेवावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम
रामलिंग यात्रेतील हा सामाजिक उपक्रम भाविकांसाठी एक सेवाभावी सोहळा ठरला. यामुळे सामाजिक ऐक्य आणि सेवा भावनेचा जागर झाला. भविष्यातही असे उपक्रम अधिकाधिक मोठ्या प्रमाणात राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..
Discussion about this post