
रवींद्र पवार,
तालुका प्रतिनिधी शिरूर..
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मुस्लि़म मावळ्यांच्या वतीने सणसवाडी जि.पुणे येथील नामांकित माहेर संस्थेत उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी माहेर संस्थेत अश्रय घेत असलेल्या गोरगरिब व वंचितांना अल्प उपहारासह मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
मी मुस्लिम मावळा शिवरायांचा या संघटनेने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेर संस्थेच्या संस्थापिका मा.सि.लूसी कुरियन या होत्या.त्यांनी आपल्या भाषणातून रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व धर्मीय समाज बांधवांना शुभेच्छा सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन सणसवाडी नगरीचे माजी सरपंच दत्ताभाऊ हरगुडे,माजी सरपंच शिवाजीराव दरेकर,कॉंग्रेस पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव (तात्या) यादव,विद्यमान उपसरपंच राजेंद्र (आण्णा) दरेकर,कॉंग्रेस मराठा आघाडीचे अध्यक्ष रामदास धुमाळ,ऐतिहासिक खर्डा नगरीतील भूमीपुञ अमोल नवले,नवनाथ भोसले,पवन राऊत,माहेर संस्थेचे व्यवस्थापक विजयभाऊ तवर,पञकार तात्याराम मोरे,पञकार गोविंद मोरे,पञकार सोमनाथ (बंटी) नवले,पञकार रविंद्र पवार,सामाजिक कार्यकर्ते श्या़म शिंगे,राजेंद्र नवले,प्रकाश कोठावळे,रमेश चौधरी,प्रशांत गायकवाड,वैभव शिंदे,शांताराम मोरे,मोतीराम भूमरे,श्या़म शहा,सुनिल पाडळे,तुकाराम कातकडे,विकास दरेकर,विठ्ठल परदेशी,ज्ञानेश्वर जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका मा.सि.लूली कुरियन दिदी यांची जगातील प्रेरणादायी व्यक्ती मध्ये सातव्या क्रमाकांवर नोंद झाल्याने मुस्लिम मावळ्यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान मी मुस्लिम मावळा शिवरायांचा या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मी मुस्लिम मावळा शिवरायांचा या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान,नजीरभाई तांबोळी,चाँदसहाब खुटामबुजे,करिमभाई शेख,जावेदभाई मनियार,मुनिरभाई आतार,अन्वरभाई शेख आदि मुस्लिम मावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्ताविक रिजवान बागवान यांनी केले असुन आभार नजीरभाई तांबोळी यांनी मानले.
Discussion about this post