
शिरपूर, दि. २६ – येथील करवंद नाका परिसरात महाशिवरात्री निमित्त भगवान महादेवाची व भगवान परशुरामाची विधीवत पुजा व महाआरती झाली. तसेच दरवर्षी प्रमाणे महाप्रसाद वाटप करण्यात आला. या प्रसंगी आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, व समाजिक, राजकीय, ,शैक्षणिक, व्यापारी, वैद्यकिय, कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
परिसरात अनेक भक्तगण अनवाणी चालत देवाच्या दर्शनासाठी आले होते. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने अनेक लोकांसाठी खास फराळ महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन केतन पंडित यांचा सोबत रोहित सालुंखे, राहुल पंडित, प्रशांत शर्मा, वेदांत शुक्ला, रोहित धमाणी, कैलाश शिंदे, भावेश पाटिल, विपुल बोरगांवकर, वरद पाठक, सुनील मगरे, भरत पोटे, प्रसाद पाटिल, प्रकाश मीणा, पंकज मौर्या, देशपाल निकुंभे , दीपक चौधरी आदिंनि या कार्यक्रमाचे आयोजन केले..
Discussion about this post