
प्रतिनिधी :- प्रमोद जमादार (7775887153)
शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांना टोल शुल्कातून सूट देण्याचा मागणीबाबत कोनताच निर्णय होऊ शकला नाही.
बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी पासून शिरपूरकर चार चाकी वाहनधारक टोल भरणार नाहीत असा ठराव करून शिरपूर फर्स्ट संघटनेची मंगळवारी या मोर्चाची सांगता झाली. भर उन्हात पायी मोर्चा नेल्यानंतर अपेक्षित फळ निष्पन्न न झाल्यामुळे मोर्चा करांनी संताप व्यक्त करून टोल वे कंपनीचे धोरण असहकार्याचे असल्याचा आरोप केला आहे. शिरपूरकर वाहनधारकांना टोल शुल्कातून सवलत द्यावी व महामार्गाची दुरुस्ती करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट तर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 वाजता बस स्थानकाजवळ चोपडा जीन येथून मोर्चाला सुरुवात झाली जुनी वर्धक ठेवलेली रिक्षा, बैलगाडी व मोर्चेकरी व त्यांच्या मागे चार चाकी वाहने अशा थाटात मोर्चा रामसिंग नगर, अमोदा गाव, महाराणा प्रताप उड्डाणपूल मार्गे महामार्गावरून शिरपूर टोल नाक्यावर नेण्यात आला. महामार्गावर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी धुळेकडे जाणारी वाहतूक थांबविले त्यामुळे दहिवद गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या टोल नाक्यावर दुचाकी व रोखठोल भरणाऱ्या वाहनांसाठी राखीव मोकळ्या भागात मोर्चा कर यांनी ठिया दिला. दरम्यान प्रकल्प व्यवस्थापक कृष्णाराव आंदोलना स्थळी येऊन पोहोचलेत त्यांनी मोर्चा- कर यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली मात्र ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून मोर्चातील युवक प्रक्षुद्ध झालेत. त्यांनी उद्यापासून शिरपूरकर टोल भरणार नाहीत असा ठराव मांडून मंजूर करून घेतला तिथून मोर्चा करी माघारी फिरलेत निरीक्षक के के पाटील सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक हेमंत खैरनार महामार्गाचे पोलीस पथकाचे मुस्तफा मिर्झा व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता मोर्चेला विविध राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला..
Discussion about this post