महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करून मराठी भाषेचा सर्वोच्च गौरव केला त्याच बरोबर प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस सर्वत्र साजरा केला जातो आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून वि स खांडेकर वाचनालयामध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. हा दिवस प्रख्यात मराठी कवी, नाटककार आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य, कविता, आणि सांस्कृतिक वारसा यासाठी केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा दिवस निवडला गेला आहे. मराठी दिनाचे उद्देश आणि महत्त्व विचारात घेऊन मराठी भाषेचा गौरव भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी, तिच्या समृद्ध साहित्यिक परंपरेची जपणूक करणे आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक, भाषिक ओळख पुढे आणणे तसेच तरुण पिढीमध्ये प्रबोधनकरणे नव्या पिढीत मराठी भाषेची आवड निर्माण करणे. साजरीकरण पद्धती साहित्यिक कार्यक्रम कविसंमेलने, निबंध स्पर्धा, नाट्यप्रयोग, वक्तृत्व स्पर्धा. सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्ये, भजन-अभंग, मराठी गीतसंगीत सादरीकरण.
सन्मान आणि पुरस्कार मराठी भाषा आणि साहित्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्य शासनाकडून सन्मान करण्यात येत असतो. वि.स खांडेकर वाचनालय सांगली येथे अनेक गुणी विद्यार्थ्यां हे स्पर्धा तयारी साठी उपस्थितीत असतात. त्यांच्या मध्ये मराठी भाषा विषयी जागरूकता व्हावी या हेतूने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थितीत प्रमुख पाहुणे डॉ विकास सलगर यांनी माहिती देताना कुसुमाग्रज यांचे योगदान बाबत बोलताना सांगितले कुसुमाग्रज यांनी नटसम्राट सारख्या नाटकांद्वारे मराठी रंगभूमी समृद्ध केली. विशाखा आणि हिमरेषा सारख्या काव्यसंग्रहांनी मराठी कवितेला नवीन दिशा दिली. १९७४ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ सलगर यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला ,मराठी भाषेचे महत्व आणि महती या वेळी सांगितली.
या वेळी सहा आयुक्त आकाश डोईफोडे , डॉ विकास सलगर, प्रशासक अधिकारी ,प्राथमिक शिक्षण मंडळ रामचंद्र टोणे मनपा ,मारुती माळी मुख्याध्यापक शाळा नंबर ९ मनपा , अशोक माणकापुरे ,प्रशासक अधिकारी, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद , ग्रंथपाल शंकर भंडारी , श्रीराम शिकलगार , राहुल मुळीक इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post