राज्य शासनाच्या धोरणानुसार नागरिकांना पारदर्शक गतिमान लोकाभिमुख प्रशासन पुरवण्याच्या हेतूने “१०० दिवसांच्या कार्यालयीन गतिमानता अभियान” मध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे सुलभीकरण तसेच कार्यालयात आल्यानंतर विविध शासकीय योजना तसेच माहिती विषयक फलक लावण्याचा उपक्रम काही दिवसांपासून तहसील कार्यालयात हाती घेण्यात आला. त्याप्रमाणे आज तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या संकल्पनेतून आणि प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनानुसार आज तहसीलदार कार्यालयातील आवारामध्ये विविध माहितीचे फलक झळकू लागले आहेत. नागरिकांना वाचण्यास सुलभ होईल अशा पद्धतीने हे फलक तयार करण्यात आले असून घरबसल्या नागरिक आता ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय मधील माहिती मिळवू शकतात त्यासाठी विविध विषयांचे क्यू आर कोड स्कॅनर तयार करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र व भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची प्रत दर्शनी भागात लावल्याने नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. क्यू आर कोड स्कॅनर द्वारे शासनाच्या विविध ऑनलाईन सेवा जसे ई चावडी, ई मोजणी ई हक्क eqj court इत्यादी विविध संकेतस्थळ,तसेच तालुक्यातील सर्व क्षेत्रीय मंडळ अधिकारी, तलाठी, रास्तभाव दुकानदार, बीएलओ यांचे गावनिहाय नाव पदनाम, संपर्क क्रमांक देखील क्यू आर कोड च्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने खऱ्या अर्थाने प्रशासन पारदर्शक कामकाज करत असल्याचे यातून दिसून येत आहे. यापूर्वी वर्षानुवर्षे धूळ खात उभे असलेले आणि फाटलेले फलक हटवण्यात आल्याने एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा नागरिकांना आणि येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे तहसीलदार डॉ अपर्णा मोरेधुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणले आहे. तर या कार्यालयीन परिवर्तनाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे आणि निवासी नायब तहसीलदार सानप यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी महेश माने रितेश कुंभार आदि उपस्थित होते.
Discussion about this post