परंडा तालुका प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर (खु)व सर्वेवस्ती येथील शाळेत शिवजन्मोत्सव सोहळा व सांज चिमनपाखराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच श्री वसंत (आबा) पाटील व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश तात्या बारस्कर सर,श्री भागवत घोगरे सर, केंद्रप्रमुख श्री संतोष देवकर साहेब व सरपंच सौ. निर्मलाताई शहाजी गरड यांच्या शुभहस्ते झाले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून आंबी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय श्री खरड साहेब,श्री तानाजी तरंगे सर, ग्रामसेवक श्री भैरवाड साहेब,श्री खरात सर श्री गायकवाड सर, कदम सर कुरे सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालय तर्फे शिवरत्न पुरस्काराचे मानकरी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबईचे धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे सर , रामचंद्र शिंदे सर, सुनिता गरड,मनीषा कदम यांना देण्यात आला.
या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव पाळणा,महाराष्ट्राची लोकधारा, बालगीत लावणी,भारुड, भीमगीत,खंडोबा गीत,हिंदी गीताचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य विशेष म्हणजे पारंपरिक हत्यार चालवणे तलवारबाजी, काठी,गोळा, आगडोम खेळणे देशभक्ती गीतावर मनोरे करणे यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी परिसरातील उंडेगाव, वाटेफळ,ताकमोडवाडी देवगाव,चिंचपूर बु येथून नागरिकांनी गर्दी केली होती.
स्नेहसंमेलनात जवळपास 75 हजार रुपये बक्षीस प्रेक्षकांनी शाळेला लोकवाटा स्वरूपात दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तानाजी पाटील, अशोक कदम, अंकुश गरड,शरद गरड, दत्ता गजरमल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक हजारे व श्री तानाजी सुर्वे, श्री रमेश शिवणकर सर, सुशांत जवळगेकर सर, श्री सूर्यवंशी सर, सौ.पूजा गरड मॅडम आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्रीय मुख्याध्यापक श्री झांबरे सर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरोधे ए. टी सर यांनी केले.मुख्याध्यापक श्री रवी राठोड सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Discussion about this post