प्रा. दिलीप नाईकवाड : सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी:
महाराष्ट्राचं गृहखात घाशीराम कोतवाल चालवत आहे का? पुण्यातील स्वारगेट एसटी आगारातील बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.महिलांच्या सुरक्षेवरन हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का ? “असा प्रश्न करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. आरोपी गुन्हे करून सैराट सारखे फिरत आहेत. महाराष्ट्रातील विद्यमान परीस्थिती पहाता मा.मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहे. अशी कड़वी टिकाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्रात महिलांवरील सतत होणारे वाढते अत्याचार ,सार्वजनीक स्थळावरील दारूचे अड्डे दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हा उपक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्री पदाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत येणाऱ्या कुभंमेळाव्यावर नजर ठेवून आपल्याच ठेकेदारानां ते मिळावं त्या दृष्टीने महायुतीमध्ये प्रयत्न केले जात आहे. गांधी हत्येत ज्यांचा सहभाग आहे , तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने माडणाऱ्यानां पुरस्कार, देवू नये असे म्हणत पंतप्रधान नरेन्द्र मोंदीनांही देखील याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी सतत 10 वर्ष सत्तेत असूनही सावरकरानां पुरस्कार दिलेल नाही अशी टिकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Discussion about this post