प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा /तालुका प्रतिनिधी
१५५ वर्षांची गुरु -शिष्य परंपरा कायम.
सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु..
येथिल सोमपुरी महाराज यांच्या पायी दिंडी पालखीचे आंतरवाला येथिल उत्सवासाठी प्रस्थान करण्यात आले असून शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणा करून दिंडी सोहळ्याला ग्रामस्थांनी निरोप दिला. मागिल १५५ वर्षांपासून परंपरेनुसार गुरु शिष्य भेटीचा सोहळा म्हणून कायम सुरू असलेल्या सोमपुरी महाराज यांच्या पायी दिंडी पालखीचे यंदाही मोठ्या उत्साहात २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी सोमपुरी महाराज संस्थान येथे समाधीचा दुग्ध अभिषेक घालून पंचपदी भजन करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर सडामर्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. प्रतेक घरासमोर पालखीचे स्वागत करुन दिंडीला पुढील मुक्कामासाठी निरोप देण्यात आला. यावेळी शेकडो महिला पुरूष वारकऱ्यांनी दिंडीत सहभागी होऊन झेंडे पताका खांद्यावर घेऊन व टाळ मृदंगाच्या जयघोषात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवण्यात आले. यावेळी यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीला निरोप दिला २६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भोसा येथे मुक्काम करून २७ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाला येथिल उत्सवासाठी पालखी दाखल होणार आहे. २८फेब्रुवारी रोजी सोहळ्याचा गोपाळकाला करून दिंडी सोहळा सोमपुरी महाराज संस्थान वर्दडी येथे स्वगृही पोहचणार आहे.

Discussion about this post