प्रतिनिधी,विजय बारस्कर
महाशिवरात्री निमित्य काल दिनांक 26/2/25 ला प्रसिद्ध अशी महाशिवरात्रीची एकादशी सर्व ग्रामीणमध्ये व शहरी मध्ये होती त्याचप्रमाणे मांगलादेवी येथील ग्रामीण भाविकांमध्ये पूर्ण काळ एकादशी करून महादेवाच्या मंदिरातून मोठी वाजत गाजत मिरवणूक काढून टाळ मृदुंग व भजन पूजा काल मिरवणूक काढण्यात आली. व रात्री कीर्तन करण्यात आले आज सकाळी महाकाल्याचे आयोजन करून भजन व महाकाल्याचे किर्तन केले
आज दुपारी गाव जेवणाचा कार्यक्रम करून कन्या भात भाकरी पोळी बुंदा असे जेवणाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. त्यामध्ये गाव शिवमय झालेले होते यामध्ये श्री महादेव संस्थान मंगलादेवी तालुका नेर जिल्हा यवतमाळ रजिस्टर नंबर 276 या संस्थांचे अध्यक्ष विलास मेहर उपाध्यक्ष, विनोद राजूरकर, सचिव रमेश सहारे विश्वास तर रामपाल इंगळे अनिल सरोदे अशोक कनाके फकीरची मते ओमकार उघडे अशोक महल्ले रवी करडे सुनील कुडमिथे भास्कर नाले किरण मांगुळकर इत्यादी व सर्व गावकरी महिला भगिनी यांनी महाकाल यामध्ये भाग घेतला .
Discussion about this post