लाडजळगाव प्रतिनिधी :
सध्या बाजारात भाजीपाला महागला आहे. गवार, लिंबू, भेंडी, कोथंबिर, काकडी, हिरवी मिरची, शेवगा, लसून, आद्रक, काकडी आता तेजीत आहेत. गवारचे बाजार ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. टोमॅटो, वांगी, कोबी, बटाटा, फ्लावर या भाज्याही आता महाग झाल्या आहेत. नगरच्या बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कमी झालेले आहे. यामुळे बहुतेक भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकविण्याचे प्रमाण कमी केलेले आहे. त्यामुळे बाजारात आपोआप पालेभाज्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.
याचे पर्यवसन पालेभाज्यांच्या भाववाढीत झालेले आहे. पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना चढ्या भावाने तो खरेदी करावा लागतो. मेथी तसेच शेपू, पालक, करडईने भाव खाल्ला आहे. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे प्रमाणही कमी झालेले आहे.
Discussion about this post